बिजनेस

Jio IPO 5 पट सबस्क्राइब! गुंतवणूकदारांना किती हजारांचा परतावा मिळणार?

Jio IPO 2026
61

Jio IPO 2026: मुकेश अंबानींचा जिओचा आयपीओ (Jio IPO) शेअर बाजारात इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे…… अवघ्या १०० मिनिटांत पूर्ण सबस्क्राइब झालेला हा आयपीओ आता भारतीय शेअर बाजारातील सर्वात चर्चेचा विषय बनलाय.. JIO च्या शेअर्ससाठी लाखो गुंतवणूकदारांनी अर्ज केले आहेत… विशेष म्हणजे, जिओच्या आयपीओची धूम सुरू असतानाच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी मुकेश अंबानींची भेट घेतली आहे… त्यामुळे अंबानींच्या साम्राज्याकडे जगाचं लक्ष वेधलं गेलंय.. पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे, जिओच्या आयपीओ मिळाला तर किती हजारांचा नफा मिळू शकतो? हा आयपीओ खरंच पैशांचा पाऊस पाडणार का? पाहूयात सविस्तर.

Jio IPO 5.57 पट सबस्क्राइब

भारतातील दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या मुकेश अंबानींच्या जिओ प्लॅटफॉर्म्सने आता शेअर बाजारात मोठं पाऊल टाकलं आहे… कंपनीचा तब्बल ३० हजार २१३ कोटी रुपयांचा आयपीओ २१ ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला असून २३ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार आहे… कंपनीने SEBI कडे दाखल केलेल्या अधिकृत कागदपत्रांनुसार या आयपीओमध्ये २७ कोटी नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत… एका शेअरची किंमत १ हजार ६५ ते १ हजार ११९ रुपये निश्चित करण्यात आली आहे…

२१ ऑक्टोबरला आयपीओ सुरू झाल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांत पूर्ण सबस्क्राइब झाला… पहिल्या दिवसाअखेर आयपीओ तीनपटींहून अधिक सबस्क्राइब झाला… तर २२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण सबस्क्रिप्शन ३.४७ पट झालं होतं… दिवसाअखेर हा आकडा ५.५७ पटींपर्यंत पोहोचला… मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा १३.२९ पट, तर किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा १.५४ पट भरल्याची माहिती आहे…. म्हणजेच जिओच्या शेअर्ससाठी उपलब्ध शेअर्सपेक्षा कितीतरी अधिक मागणी निर्माण झाली आहे.

हेही वाचा: अंबानींचा Jio IPO येतोय! Jio IPO मध्ये पैसा लावावा का? गुंतवणुकीआधी हे जाणून घ्या

एका लॉटवर किती हजारांचा नफा मिळू शकतो? (Jio IPO 2026)

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आयपीओमधून सामान्य गुंतवणूकदाराला किती नफा मिळू शकतो? जिओच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १२ शेअर्स आहेत. त्यामुळे कमाल इश्यू किमतीनुसार एका लॉटसाठी १३ हजार ४२८ रुपये गुंतवावे लागणार आहेत. २२ ऑक्टोबरच्या आर्थिक वृत्तांनुसार जिओच्या शेअरचा ग्रे मार्केट प्रीमियम सुमारे २४० रुपये होता. म्हणजेच १ हजार ११९ रुपयांचा शेअर बाजारात १ हजार ३५९ रुपयांवर लिस्ट होऊ शकतो, अशी शक्यता आहे…मात्र मागणी वाढतच असल्याने 1500 ते 1700 रूपयांच्या आसपासही जाण्याची शक्यता आहे…

दरम्यान, जिओच्या आयपीओची चर्चा सुरू असतानाच २१ ऑक्टोबरला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी गुजरातमधील जामनगर येथे मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांची भेट घेतली. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर हेदेखील यावेळी उपस्थित होते…अंबानींनी रिलायन्सच्या भविष्यातील डिजिटल पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीची माहितीही दिली….विशेष म्हणजे जिओचा आयपीओ सुरू झाला, त्याच दिवशी ही महत्त्वाची भेट झाली. त्यामुळे रिलायन्स समूहाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताकद पुन्हा चर्चेत आली आहे…

हेही वाचा: IDBI Bank Deal : आयडीबीआय बँकेचा मालक बदलणार? ₹52,878 कोटींची डील, फेअरफॅक्स ठरणार नवी भागीदार!

Jio IPO अलॉटमेंट आणि लिस्टिंगची तारीख कधी?

समजा, जिओच्या आयपीओमध्ये तुम्ही १३ हजार ४२८ रुपये गुंतवून १२ शेअर्सचा एक लॉट घेतला. एका शेअरमागे ३०० रुपयांचा नफा मिळाला, तर एकूण ३ हजार ६०० रुपयांचा फायदा होऊ शकतो. तर एका शेअरमागे ४०० रुपयांचा नफा मिळाल्यास तब्बल ४ हजार ८०० रुपये कमावता येऊ शकतात.

आता जिओच्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस २३ ऑक्टोबर आहे. २६ ऑक्टोबरला शेअर्सचं वाटप अपेक्षित असून २८ ऑक्टोबरला जिओचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष २८ ऑक्टोबरकडे लागलं आहे. मुकेश अंबानींचा जिओ आयपीओ गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी हजारोंचा नफा मिळवून देणार की मोठ्या अपेक्षांवर पाणी फेरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts