कास – यवतेश्वर घाटात वन्य माकडांना केळी खाऊ घातल्या प्रकरणी शिवाजी नानासाहेब देशमुख यांच्यावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. माकडांना खाऊ घालू नये यासाठी जनजागृती करण्यात येत असून, ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात येणार आहेत, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.