यवतमाळच्या वणीच्या उकणी कोळसा खान प्रशासनाविरुद्ध काँग्रेसचे राज्याचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सुरु आहे. कोकणी खान ते जुनाट फाट्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती व पांगरीकरण करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. सकाळी साडे सहा वाजता पासून रस्ता रोखण्यात आला असून काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.