अमेरिकेत 16 वर्षीय मुलाच्या आत्महत्येसाठी ChatGPT जबाबदार असल्याचा गंभीर आरोप झाला आहे. मुलाचे पालकांनी OpenAI विरुद्ध खटला दाखल केला असून, AI ॲपने त्यांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘ChatGPT’ने वैद्यकीय आपत्कालीन स्थिती ओळखूनही आत्महत्येवर संवाद सुरू ठेवला, अशी तक्रार आहे. या प्रकरणानंतर OpenAI ने सुरक्षा अधिक कडक करण्याचे आश्वासन दिले आहे.