छत्रपती संभाजीनगरमध्ये देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरवर काळाने घाला घातला. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांचा ट्रॅक्टर घाटातील दरीत कोसळून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी संध्याकाळी पिनाकेश्वर महादेव मंदिराजवळ घडली. जखमींपैकी सोनाली राऊत यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.