बीड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला. घाडगे म्हणाले की, “शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हल्ले करत आहेत. पण आता शेतकऱ्यांचा लढा उभा राहणार आहे. कर्जमाफी, शेतमालाला भाव आणि पीक विमा या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला जाईल. गावागावात मतं मागण्यासाठी जाणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची लेकरं थेट प्रश्न विचारणार आहेत.”