मेहकर तालुक्यातील खंडाळादेवी येथे आठ वर्षीय मुलीचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. मृत मुलीच्या आई-वडिलांची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ती छत्रपती संभाजीनगर येथील वस्तीगृहात शिक्षण घेत होती. सणासुदीच्या काळात ती आपल्या आई-वडिलांकडे आली होती, त्या दरम्यान साप चावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले गेले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.