औधं कडून शिवाजी नगरकडे जाणारा उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून अद्यापही हा पूल नागरिकांसाठी वाहतुकीकरीता खुला झालेला नसल्याने आज पुण्यात मनसे कडून या उड्डाणपुलावर शासनाचा निषेध करत तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मनसे कार्यकर्त्यांकडून नारळ फोडून या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.