छत्रपती संभाजीनगर शहरातील संभाजी कॉलनीमध्ये पाडसवान कुटुंबावर हल्ला करून एका व्यक्तीचा जीव घेतला तर दोघांना गंभीर जखमी केले. या घटनेवरून नागरिक आक्रमक झाल्या असून सिडको पोलीस स्टेशनला नागरिकांनी घेराव घातला आहे. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी त्याचबरोबर आरोपींच्या आकाला देखील अटक करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलीस नागरिकांची समजूत काढत आहेत.