दिल्लीतील भटक्या कुत्र्यांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, “सध्याच्या कायद्यानुसार आणि भावनेनुसार अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. सर्व जीवांवर दया दाखवणे हे आपले संवैधानिक मूल्य आणि कर्तव्य आहे, हे सांगण्याची गरज नाही.” याचिकेमध्ये दिल्लीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.