अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दावा केला आहे की, त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत सहा युद्धं संपवलीत त्यात भारत-पाकिस्तान संघर्षही असल्याचा त्यांचा आग्रह! मात्र भारताने स्पष्ट केलं आहे की हा युद्धविराम थेट लष्करी चर्चेतून झाला, तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीने नाही. इतर अनेक देशांनीही ट्रम्प यांच्या ‘जागतिक शांतिदूत’ प्रतिमेवर शंका व्यक्त केली आहे. बहुतेक करार तात्पुरते युद्धविराम ठरले असून दीर्घकालीन शांततेचं चित्र अजूनही धूसर आहे. आता फक्त नोबेल पुरस्काराची वाट पाहायची बाकी