मतदान चोर, खुर्ची सोड’ ; काँग्रेसच्या निशाण्यावर सत्ताधारी अन् निवडणूक आयोग..
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी महाराष्ट्रात मत चोरल्याचा आरोप भाजप व महायुतीवर केला आहे. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट केले. मतांच्या चोरीचा दावा केल्याने यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच खामगाव आणि शेगाव काँग्रेसच्यावतीने ‘मतदान चोर, खुर्ची सोड’ आंदोलन करून कँडल मार्च काढण्यात आली. आता हाच मुद्दा घेऊन काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.