चोपडा तालुक्यात कापसाच्या क्षेत्रात यंदा २०% घट झाली असून मकाच्या लागवडीत तब्बल ९७% वाढ झाली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव, लाल्या रोग आणि कमी भावामुळे शेतकरी कापसाऐवजी मकाकडे वळले आहेत. वेळेवर पावसामुळे खरिप हंगामातील पेरणी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी दिली.