नवी मुंबईतील एरोली परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपण IAS अधिकारी, राज्य सरकारचे मुख्याधिकारी असल्याचे भासवून, तसे बनावट ओळखपत्र बनवून त्याच आधारे अनेक सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडे पैशांची मागणी करून अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले. त्याच्या घराच्या तपासणीत अनेक बनावट ओळखपत्र सापडले आहेत. संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. RNO












