बुलढाणा जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी चोरी आणि ज्वेलर्सच्या दुकानांतील चोऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने देऊळगाव राजा शहरातून अटक केली. त्यापैकी एकाला सिनेस्टाइल पाठलाग करून पकडण्यात आले. अटकेतील आरोपींना पुढील कारवाईसाठी मेहकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.












