Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मित्राने डीपीला ‘नाईस’ पाठवल्याच्या रागात, प्रसिद्ध महिला डॉक्टराच्या डोक्यात पतीने घातला खलबत्ता..
गुन्हा

मित्राने डीपीला ‘नाईस’ पाठवल्याच्या रागात, प्रसिद्ध महिला डॉक्टराच्या डोक्यात पतीने घातला खलबत्ता..

अंबरनाथ इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांच्यावर त्यांच्या पतीनेच घरगुती वादातून थेट डोक्यात खलबता घातला आतला आहे. यामध्ये त्या गंभीर झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. शाळेतील मित्राने महिला डॉक्टरच्या डिपीला ‘नाईस डीपी’ असा मेसेज केल्याच्या रागातून पतीने हा प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप या महिला डाॅक्टरने केला आहे. त्यांच्या मुलाने बचाव केल्याने डॉ. शिंदे यांचा जीव वाचला. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिम येथील गृहसंकुला येथे त्यांचे पती आणि दोन मुलांसह राहतात. मागील काही वर्षांपासून डॉ. शिंदे आणि त्यांचे पती यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. सकाळच्या सुमारास डॉ किरण या घरात गाण्याचा रियाज करण्यासाठी उठल्या. त्यांच्या सांगण्यानुसार त्यावेळी पती विश्वंभर शिंदे मुलाच्या रुममध्ये शांत बसले होते. त्यांच्यासाठी चहा करण्यासाठी डॉ किरण स्वयंपाकघरात गेल्या. यावेळी त्यांच्यात काही किरकोळ वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर भांडणात सुरू झाले आणि हा सर्व प्रकार घडला.

हे ही वाचा – डाव फसला! रोहित आर्याचा अभिनेत्री रुचिता जाधवला ‘आरए स्टुडिओ’त येण्यासाठी फोन

शाळेतल्या मित्राने नाईस डीपी असं पाठवलं

डॉ. शिंदे माहिती देताना म्हणाल्या, एक दिवस अगोदर आम्ही माथेरानला गेलो होते. त्याचे काही फोटो स्टेटस आणि डिपीला ठेवण्यात आले होते. त्यावर एका फोटोवर माझ्या शाळेतल्या मित्राने नाईस डीपी असं पाठवलं होतं. त्यांच्या मनात याचा राग होता. याच वादातून विश्वंभर यांनी स्वयंपाकघरात येऊन किरण शिंदे यांचा गळा पकडला आणि त्यांच्या डोक्यात खलबत्त्या घातला. या जिवघेण्या हल्ल्यात त्यांना मोठी इजा झाली आहे.

मुलं उठली नसती तर कदाचित माझा जीवही गेला असता

घाबरलेल्या डॉ. किरण यांचा आरडाओरडा ऐकून त्यांच्या मुलांनी स्वयंपाकघरात धाव घेत आईची सुटका केली. तरीही विश्वंभर यांची मारहाण सुरूच होती. शेवटी किरण यांच्या डोक्यातून रक्त निघायला लागलं. कपडे रक्ताने माखले. मुलं उठली नसती तर कदाचित माझा जीवही गेला असता, असं डॉ किरण म्हणाल्या.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts