Rohit Arya crime incident : मुंबई शहरामध्ये आरए स्टुडिओत 17 शाळकरी मुलांसह 19 जणांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतून आता विविध खुलासे होत असून या संपूर्ण घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या पैकी एका आजीने आता घडलेल्या संपूर्ण घटनेची कहाणी सांगितली आहे.
रोहित आर्या हा आरोपी कमांडो कारवाईत मृत पावला असला तरी या घटनेला पूर्णविराम लागलेला नाही. ऑडिशन आणि शूटिंग चे आमिष दाखवून हा आरोपी मुलांना ओलीस ठेवत होता. त्याने या मुलांसोबत काय केले ? मुलांसोबत भेदभावाची वागणूक देणे हे अत्यंत लाजिरवाणं आणि धक्कादायक होतं. कोल्हापुरातील एका नामांकित शाळेने या ऑडिशन ची माहिती दिली होती. त्यानंतर ऑडिशनसाठी मुलं मुंबईत आली होती.
कोल्हापूर येथील मंगल पाटणकर या आजी त्यांच्या नाती सोबत ऑडिशनला मुंबईत आल्या होत्या. आरोपी रोहित आर्याने मुंबईत आलेल्या मुला मुलींची ऑडिशन घेतली. त्यानंतर शूटिंग दोन दिवसांनी होईल असे सांगितले. त्यानंतर बुधवारी त्याने विचित्र मागणी करत मुलांना एका खोलीत जाण्यास सांगितले. आणि पालकांना बाहेर थांबण्यास सांगितले.
आणखीन काही व्यक्तींचा देखील सहभाग
सर्व पालक बाहेर थांबले. त्यानंतर आरोपी रोहित आर्याने गेटला कुलूप लावून घेतले. आणि नंतर काही मुलांना घेऊन तो स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर गेला. तसेच आरोपीने स्टुडिओज मध्ये गेल्यावर मुलांमध्ये देखील भेदभाव केला. श्रीमंत आणि गरीब मुलांना वेगवेगळ्या मजल्यावर ठेवले. या सर्व प्रकरणात रोहित सोबत आणखीन काही व्यक्तींचा देखील सहभाग असल्याचा संशय आजींनी व्यक्त केला.
शटरला दोन मोठी कुलपे
स्टुडिओमध्ये रोहित आर्या हा मुलांना पळणे, वाचणे, किडनॅपिंग करणे, बॉम्बस्पोट अशा सिनची शूटिंग करण्यासाठी बोलवत होता. शूटिंगच्या नावाखाली त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे काढून त्याऐवजी लाइट्स लावले होते. आणि स्टुडिओ मधील बसण्याची जागा पूर्णपणे बंद करून शटरला दोन मोठी कुलपे लावली होती. ज्यामुळे बाहेरचा माणूस कोणीही आत येणार नाही आणि आतला माणूस बाहेर जाऊ शकणार नाही.
श्रीमंत आणि कोणती गरीब आहे याचा संपूर्ण तपास
मंगल पाटणकर या आजीला देखील त्याने मुलांसोबतच ठेवले होते. आजीने सांगितले की, रोहित ने चार दिवसात कोणती मुले श्रीमंत आणि कोणती गरीब आहे याचा संपूर्ण तपास केला. त्यानंतर त्याने श्रीमंत आणि लहान मुलांना दुसऱ्या फ्लोअरवर नेले. रोहित आर्या कडे बंदूक होती. तो मुलांना वारंवार दाखवत होता. रोहित ने आजींना मुलांवर लक्ष देण्यास सांगितले. यापुढे आजी म्हणाल्या की, आरोपी रोहित आर्या हा हसत होता तर पालक रडताना दिसत होते. बरेच पालक मुलांना भेटण्यासाठी झटपट करत होते.
रोहित आर्या सोबत एक काळा दाढीवाला. एक प्रियंका नावाची मुलगी होती. ती देखील मोबाईलवर कोणालातरी कॉल करून मोठ्या मोठ्याने हसत होती. (Rohit Arya crime incident)











