नागपूर-जबलपूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर, मदतीसाठी अनेक वाहनांना विनवण्या करूनही कोणी न थांबल्याने हतबल पतीने त्याच्या पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून रूग्णालयात घेऊन जात होता. हा हृदयद्रावक प्रकार व्हायरल झाला असून माणुसकी हरवल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे.