बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील एका विहिरीत हातपाय बाधलेला 48 वर्षीय व्यक्ती चा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून घटनेचा तपासा सुरू केला आहे. विहिरीतील मृतदेह हा खामगाव येथे राहणाऱ्या घनश्याम भुतडा यांचा असल्याचे समोर आले असून हातपाय बांधलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे पोलिसाना घातपाताची शंका बळावली असून त्यादृष्टीने तपास सुरू केलाय.. तर मृतकाचे नातेवाईकांनी सुद्धा घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी करताहेत.. मृत घनश्याम भुतडा हे दोन दिवसापूर्वी खामगाव येथून शेगाव येथील एका महाविद्यालयात आपल्या मुलाच्या ऍडमिशनसाठी जात असल्याचे सांगून गेले होते. परंतु ते परतले नसल्याने खामगाव शिवाजीनगर पोलिसात या प्रकरणी कुटुंबीयांकडून हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.