घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात डेंगूसदृश्य तापाने अक्षरशः थैमान घातले आहे. कुंभार पिंपळगाव येथील व्यापारी लक्ष्मण सोमेश्वर कंटुले यांचे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. यासह परिसरातील खाजगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात डेंगूसदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.