गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून ४ दिवसांत ६६ रुग्ण आढळले, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येल्ला, लगाम, काकरगट्टा यांसह अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.