धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे शेतीच्या वादातून सहदेव पवार आणि प्रियंका पवार यांच्यावर भर रस्त्यात हरिभाऊ चव्हाण आणि त्याच्या मुलाने कोयत्याने वार केले. या हल्ल्यात प्रियंका पवार जागीच मयत झाल्या, तर सहदेव पवार धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मयत झाले. दोघांच्या पश्चात दोन मुली व वयस्कर आई-वडील आहेत. चार वर्षांपूर्वी शेतीवाटपाच्या वादातून सहदेव पवार आणि हरिभाऊ चव्हाण यांच्यात संघर्ष झाला होता. पंधरा दिवसापूर्वी सहदेव पवार जामिनावर सुटले होते. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून बेंबळी पोलीस आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शोध सुरू केला आहे.