सातारा जिल्ह्यातील वाई येथील धोम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने कृष्णा नदीपात्रात 5 वक्र दरवाजातून 8,700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे वाई येथील कृष्णा नदी पात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिरासह परिसरात पाणी भरले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत असून मंदिरातील गणपतीच्या पाया पायापर्यंत पाणी पोहोचले असून कृष्णामाईने चरण स्पर्श करून दर्शन घेतले असा योग पहावयास मिळाला आहे.
श्रावण महिन्यातील हा दुसरा योग असल्याचे येथील पुजाऱ्यांनी सांगितले.