अंमली पदार्थांचे व्यवहार आता गल्ली-कुच्यांपुरते मर्यादित नाहीत, तर ते एन्क्रिप्टेड चॅट्स व खाजगी सोशल मीडिया ग्रुप्समध्ये लपले आहेत. एनफोर्समेंट ब्युरो–सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ए. अमलराज यांच्या मते, सुरक्षित मेसेजिंग अप्सच्या वाढत्या वापरामुळे अमली पदार्थांच्या व्यवहारांचा मागोवा घेणे पोलीसांसाठी डिजिटल लपंडाव ठरले आहे. नामांकित टोळ्यांवर नजर असूनही सीमारेषा व समुद्रमार्गे तस्करी सोशल मीडियावरून सुरूच आहे.