मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व 38 गावांमध्ये गणेशोत्सवासह वर्षभर विविध सण उत्सवासाठी कोणत्या प्रकारचे डीजे डॉल्बीला परवानगी देणार नाही. सर्वांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून सण उत्सव, मिरवणूक काढावेत जर कोणी डॉल्बी वाजविले तर त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिला आहे.