पुण्यातील आंबेगाव परिसरात सासरच्या त्रासामुळे स्नेहा विशाल झंडगेने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच सासरच्या छळामुळे वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली होती, आणि आता यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्नेहाच्या नातेवाईकांनी सासरकडून सतावणुकीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली असून, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तिच्या पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासु विठाबाई झंडगे, आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.