मुंबई आणि उपनगरात घर घेणं हे सर्वसामान्यांचे मोठे स्वप्न असते.आता हजारो कुटुंबांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सिडको लवकरच नवी मुंबईत महालॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत घरांच्या किमती परवडणाऱ्या करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.