जळगाव जिल्ह्यातील पारोळा-भडगाव रस्त्यावर बस आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. येथील चोरवड-पारोळा रोडवर हा अपघात झाला.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर, जखमींना तात्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.