आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण येथे गेली सत्तर वर्षांपासून एक गाव एक गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे गणेश मंडळ यांच्या वतीने दहा दिवस मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात गणेश उत्सव साजरा होत आहे. या गणेश उत्सव निमित्त टाळ मृदंग गजरात महाआरती गणेशाची संपन्न होत असून दहा दिवस घरोघरी चूल बंद आहे. गणेश उत्सवा निमित्त एकत्रीत सर्व ग्रामस्थ सकाळ संध्याकाळी महाप्रसाद घेत आहेत.