धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात झोपडीत राहणाऱ्या वृध्द विधवा महिलेला 83 हजारांचे विज बिल मिळाल्याच्या बातमी संदर्भात पालकमंत्री जयकुमार रावल यांना प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात चुकीचे काही झाले असणार, तर दुरुस्ती करण्याचे काम संबंधीत अधिकारींना सांगू आणि कोणी चुकत असणार तर कडक कारवाई करू. असा इशारा यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे.