मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघातात एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक दिली. बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ही महिला मॉर्निंग वॉकला निघाली होती. महिलेला तातडीने जे जे रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे