मुंबईच्या लोकलमधील गजबज, वाढती लोकसंख्या आणि अनियंत्रित स्थलांतर हे शहरावरचे मोठे ओझे असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सरकारच्या दुर्लक्षावर टीका करताना म्हटलं, “सरकारी जमिनींवर झोपडपट्टी उभी राहते, मात्र मोठ्या उद्योगपतींच्या जमिनी मात्र तशाच राहतात. धनदांडगे येतात आणि आमच्यासमोर पार्किंग नको म्हणतात.” हा मुद्दा त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.