लोणावळ्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेल्या सालतर गावात आज सकाळी मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे एक हेलिकॉप्टर अडचणीत आले. हवामान प्रतिकूल असल्याने पायलटने खबरदारीचा उपाय म्हणून आपत्कालीन लँडिंग केले. या घटनेमुळे गावकऱ्यांत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली