वाळुज औद्योगिक वसाहतीत अलीकडे वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर वाळुज शहरातील उद्योजक मंडळी व पोलीस प्रशासन यांच्यात विशेष बैठक पार पडली. बैठकीदरम्यान उद्योजकांनी आपल्या शंका मांडत, सीसीटीव्ही कॅमेरे, तात्काळ मदत केंद्र, तसेच तातडीने प्रतिसाद देणारी विशेष पथके तयार करण्यावरही भर देण्यात आला.