वाशिमचे शेतकरी मनीष देशमुख यांनी यंदा गणेशोत्सवासाठी गाईच्या शेणापासून १५०० हून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. गेल्या वर्षी ६०० मूर्ती विक्रीतून त्यांना १ लाखांचा नफा झाला होता, तर यंदा तब्बल २ लाखांचा फायदा अपेक्षित आहे. या मूर्ती विसर्जनानंतर खत म्हणून वापरता येतात. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे १० बेरोजगारांना रोजगार मिळाला असून, देशमुख गाईच्या शेणापासून अगरबत्ती, धूपबत्ती यांसारखी उत्पादने तयार करून शेतीसोबत जोडधंदाही उभारत आहेत.
बाईट:मनीष देशमुख,वाशिम