जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडी गावातील शेतकरी जगदीश शेंडगे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून पारंपरिक शेतीऐवजी इराणी खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. कधी ओला, कधी कोरडा दुष्काळ असलेल्या संकटांमध्येही त्यांनी खजूरातून लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे. नव्या वाटेचा धाडसी निर्णय त्यांच्या आयुष्यात गोडवा घेऊन आला असून इतर शेतकऱ्यांसाठीही ते प्रेरणादायी ठरत आहेत.