चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यात येणाऱ्या अडेगाव येथे आज ऐन पोळ्याच्या दिवशी बळीराजाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या गावातील शेती पाण्यात बुडाली असून शेतकऱ्यांवर कर्ज देखील आहे. गणपत भाऊजी नागापुरे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून मोठ्या कष्टाने फुलविलेल्या शेतीचे डोळ्यादेखत नुकसान होताना बघणे त्यांना असह्य झाल्याने त्यांनी त्यांचे जीवन संपवले. या घटनेने चंद्रपूर जिल्हात शोककळा पसरली आहे.