संपूर्ण देशभरात बळीराजाचा बैलपोळा सण हा मोठ्या उत्सवात साजरा केला गेला, त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात सुद्धा हा सण ठिकठिकाणी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आलाय मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आडगाव येथे बैलपोळा सणावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, या बैलाचा एन पोळ्याच्या दिवशीच विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण आडगाव सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.