गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यात आदिवासी विकास महामंडळानं खरेदी केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं होतं. आजी-माजी आमदारांनी उपोषण मंडपाला भेट देऊन तांत्रिक अडचणी दूर करत तातडीने चुकारे देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करू हे उपोषण सोडविले. मात्र 14 तारखेपर्यंत चुकारे सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.