कृषी विज्ञान केंद्राकडून प्रथम रेषीय प्रात्यक्षिक हळद पिकाची टोकन यंत्राद्वारे लागवड या प्रात्यक्षिकांतर्गत हळद पिकाची शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड करण्यात आली. यामधीलच लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतावर हळद लागवड प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. त्यामुळे तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.