गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त केला आणि मृत युवकांना श्रद्धांजली अर्पण केली. आणखी २ युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यंत्रणांना तातडीने मदतीचे निर्देश देण्यात आले आहेत.