चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे चारवट गावाचा संपर्क तुटला आहे. या गावातील तीन वर्षाची मुलगी तापाने आजारी पडली. हे तिच्या आई वडीलांना सहन न झाल्याने वडिलांनी जीवाची पर्वा न करता मुलीला खांद्यावर घेऊन रुग्णालय गाठले. या गावात रुग्णालय उपलब्ध नसून पर्यायी रस्त्याची देखील सुविधा उपलब्ध नाहीये. यावरून तेथील प्रशासन काय करतंय असा सवाल उपस्थित होतोय.