बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. हि घटना 13 ऑगस्ट रोजी घडली तर 19 ऑगस्ट रोजी उघड झाली आहे. आरोपीने मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीत टाकला होता. या प्रकरणी मृतकाची सुन व आरोपीची पत्नी हिनेच पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.