तुझ्या शरीरात 4 राक्षस आहेत, त्यांना शरीराबाहेर काढण्यासाठी 11 वेळा संभोग करणे आवश्यक आहे, नाही तर ते राक्षस तुझा जीव घेतील असे सांगून एका नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला शिकार बनवले आणि एकाच दिवशी तिच्यासोबत 3 वेळा संभोग केला. मुंबईजवळच्या विरारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अंध व्यक्तीने भूत-प्रेत काढण्याच्या बहाण्याने 17 वर्षांच्या विद्यार्थिनीचे एकाच दिवसात 3 वेळा शोषण केल्याचे सांगितले जात आहे. पॉक्सो कायद्या अंतर्गत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.