पुण्यातील कोथरूड येथील गोल्डन बेकरीला पहाटे आग लागली. आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सहा अडकलेल्या जणांची सुटका केली. अग्निशमन दलाने पाच वाहने पाठवून आगीवर नियंत्रण मिळवले आणि तीन मजली इमारतीतील तीस रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. बेकरीमधून सहा सिलेंडर वेळीच बाहेर घेतल्याने मोठा धोका टळला. सद्यस्थितीत अग्निशमन दलाचा कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.