लडाखमध्ये रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठा गोंधळ उडाला. जेवणानंतर तब्बल १२० क्रू मेंबर्सना पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखीची लक्षणे दिसू लागली. सर्वांना तातडीने लेहमधील एसएनएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते हे सामूहिक फूड पॉइझनिंगचे प्रकरण असून, तातडीने उपचार केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. बहुतेकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला