चंद्रपूर जिल्ह्यात एका वनरक्षकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडीत मुलीने आपला अनुभव कुटुंबियांना सांगून पोलिसांत तक्रार केली. बल्लारपूर पोलिसांनी आरोपी वनरक्षक रंजीत दुर्योधन याला गोंदिया येथून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.