छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी आमदार तनवाणी यांचा 26 वर्षीय पुतण्या दिनेश तनवाणी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घरातच गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. घटनेची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.