काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व चांदवड-देवळा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा पक्षाला नसून फक्त पदाला दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी एक दिवसाचा कार्यकर्ता नाही. जर मी कुठे जाणार असेल तर माझ्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईन. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत.” असे त्यांनी सांगितले.