नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची घटना सकाळी सात वाजता मुख्य अपलाईनवर घडली. सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून मुंबईकडे जाणाऱ्या Rajdhani Express आणि Dhule-Dadar MEMU या प्रमुख गाड्या खोळंबल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे